नमस्कार,

नवी अर्थक्रांती हे एक प्रकाशन आहे. या अंतर्गत उद्योग आणि व्यवसायाशी संबंधित मासिक आणि पुस्तके प्रकाशित करण्यात येतात. तसेच उद्योगात येणाऱ्या सर्व समस्यांवर विनामुल्य मार्गदर्शन केले जाते. नवे विषय आणि नवे लेखक यांबाबत ‘नवी अर्थक्रांती’ नेहमीच स्वागतशील राहिले आहे. व्यवसाय आणि व्यवस्थापन, स्टार्टअप्स, करिअर आणि रोजगार, विक्री आणि विपणन, डिजिटल तंत्रज्ञान, आर्थिक आणि बँकिंग, आधुनिक शेती हे विषय नवी अर्थक्रांतीच्या पुस्तकांचा केंद्रबिंदू राहिले आहेत. 

साक्षर, संपन्न व समृध्द महाराष्ट्र घडवण्यासाठी व महाराष्ट्राची ही ओळख जगभर पोहोचवण्यासाठी नवी अर्थक्रांतीची सुरुवात चार वर्षांपूर्वी झाली. समाजातील सर्व स्तरावर आर्थिक ज्ञान पोहोचवणे व त्यातून वेगवान विकास घडवून आणणे हे ध्येय घेऊन उद्योगविषयक माहिती, आर्थिक साक्षरता, तंत्रज्ञान, चालू घडामोडी तसेच प्रेरणादायक गोष्टींनी परिपूर्ण केवळ चांगल्या आणि उत्कृष्ट ज्ञानाचा शोध घेणे व त्याला प्रकाशित करणे, हे काम गेली तीन वर्षे फेसबुक आणि इतर समाज माध्यमांतून करत आहोत. दररोज सकाळी ०६.०० वाजता आकर्षक छायाचित्राबरोबर प्रकाशित होणारा प्रेरणादायी सुविचार दिवसाची सुरुवात चांगली करतो, म्हणून अनेक लोक वाट पाहत असतात. सकाळी १०.०० वाजता प्रकाशित होणारे लेख दिशादर्शक व मार्गदर्शक ठरत आहेत. त्याचबरोबर दुपारी यशस्वी उद्योगाच्या कथा आणि इतर उपयुक्त माहिती प्रकाशित केली जाते. समाजातील केवळ सकारात्मक गोष्टींना प्रसिध्दी देऊन तरुणांना उर्जा देण्याची कार्यप्रणाली अखंडपणे चालत आहे. बिझनेस गप्पा, तसेच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन दिले जाते.

जगातील जे काही सर्वोत्तम असेल ते महाराष्ट्रात उपलब्ध करुन देण्याचा ध्यास घेतलेली माणसे या चळवळीशी जोडली जाऊ लागली आहेत. लाखो युवकांना प्रेरणा देणारे विचार नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून वेळोवेळी अखंडितपणे लोकांपर्यंत पोहोचत आहेत. नवी अर्थक्रांतीच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्रात अनेकांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे, वाढवला आहे. नवी अर्थक्रांतीने महाराष्ट्रातील तरुणाईला वेगवान करण्यासाठी अनेक उपक्रम सुरु केले आहेत. महाराष्ट्राच्या अनेक भागात व्याख्याने, चर्चासत्रे, मार्गदर्शनपर कार्यक्रम राबवले गेले आहेत. असेच अनेक उपयुक्त कार्यक्रम, भाषांतरित पुस्तके, आर्थिक वर्षानुसार दिनदर्शिका, स्टार्टअप महाराष्ट्र, थेट परदेशी गुंतवणूक यासारखे नवीन उपक्रम घेऊन आपल्या सेवेत उपयुक्त ठरण्याची भूमिका चालू आहे.

त्याचबरोबर ‘महास्टार्टअप’ या उपक्रमाअंतर्गत कोणत्याही व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व सेवा (सोशल मीडिया मार्केटिंग, वेबसाईट, कंपनी रजिस्ट्रेशन, इत्यादी)  एका छताखाली उत्तम दर्जा व वाजवी दरात या सेवा उद्योजकांना उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असतो. तसेच NavBiz.in या ऑनलाईन बिझनेस डिरेक्टरीच्या माध्यमातून आपण आपला व्यवसाय फक्त महाराष्ट्रभर नाही, भारतभर नाही, तर जगभर पोहोचवू शकता.

हे सर्व अविरत चालू राहावे यासाठी आम्हाला आपल्या सर्वांच्या प्रेमाची आणि आशिर्वादाची साथ हवी आहे. आपल्याला जगासोबत अपडेटेड ठेवण्यासाठी उपयुक्त माहिती आणि ज्ञानाचा खजिना उपलब्ध करून देण्यासाठी ‘नवी अर्थक्रांती’ सदैव तत्पर आणि कटिबद्ध आहे.

‘नवी अर्थक्रांती’ला अधिक प्रभावी आणि परिपूर्ण करण्यासाठी आपल्या प्रतिक्रियांचे कायम स्वागतच आहे. कृपया आपली प्रतिक्रिया naviarthkranti@gmail.com या मेलआयडीवर किंवा 8898794864 या व्हॉटस अ‍ॅप क्रमांकावर कळवा.

धन्यवाद,

– नवी अर्थक्रांती

पुस्तके खरेदी करण्यासाठी भेट द्या – http://naviarthkranti.org/shop

Copyright © 2019 Navi Arthkranti

Shares
WhatsApp WhatsApp us